शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मतपत्रिकांची नक्कल केल्यास होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:49 AM

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या निवडणूक मतपत्रिकेची नक्कल करणारी मतपत्रिका ...

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या निवडणूक मतपत्रिकेची नक्कल करणारी मतपत्रिका छपाई केल्यास उमेदवारासह त्याची छपाई करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावले आहेत. बहुतांशी वेळेस राजकीय पक्ष वा उमेदवारांकडून मतदारांना मतदान कसे व कोणाला करावे यासाठी नमुना मतपत्रिका तयार केली जाते. यंदा आयोगाने त्याला निर्बंध घातले आहेत. हुबेहूब मतपत्रिकेची नक्कल, रंग, कागद वापरल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.निवडणूक आचारसंहितेचाच हा भाग असून, उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीने मुद्रणालयाच्या सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाºया मालकाने तसेच प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापू नये, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्णात त्याला निर्बंध घालण्यात आले असून, त्यात उमेदवारांचे नाव व त्यांना नेमुना देण्यात आलेली चिन्हे छापणे, नमुना मतपत्रिकेसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे गैर असल्याने त्याचा भंग झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. हा सदरचा आदेश मंगळवार, १९ मार्च ते ३० एप्रिल या काळासाठी लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय