नाशिक : साधुग्राममधील निर्मोही, निर्वाणी, दिगंबर व इतर आखाड्यांमध्ये १९ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी ध्वजस्तंभ उभारण्याच्या कामास गती देण्यात आली आहे. आखाड्यांमध्ये सात ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आखाड्यांमध्ये हवे त्याठिकाणी जेसीबीने ध्वजस्तंभ बुधवारी पोहोचविण्यात आले आहेत. स्ािंहस्थ ध्वजारोहणानंतर आता साधुग्राममधील आखाड्यांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी आखाड्यांमध्ये मंडप, ध्वजस्तंभ निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. आखाड्याच्या महंतांनी आपल्या मूळ आश्रमाच्या ठिकाणावरून ध्वजस्तंभ आणले आहेत. ध्वजारोहणाला तपोवनात भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यासाठी पोलिसांकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून गेल्या चार दिवसांपासून तपोवनातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
आखाड्यांमध्ये ध्वजस्तंभ दाखल
By admin | Updated: August 5, 2015 22:35 IST