नाशिक : दुकान चालवायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल अशी धमकी देत मारहाण करून गल्ल्यातील रक्क्म बळजबरीने घेऊन जाणाऱ्या मल्हारखाणीतील तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीवायके महाविद्यालयासमोरील ऋषीराज हाईटमधील रहिवासी गिरीश दीपक इसराणी यांचे मेहेर सिग्नलवर ए वन कलर लॅब नावाचे दुकान आहे़ बुधवारी (दि़२३) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास संशयित गणेश भीमनाथ (रा़मल्हारखाण)व त्याचे दोन साथीदार मद्याची बाटली घेऊन दुकानात आले़दुकानात बसलेले इसराणी यांना दुकान चालवायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल अशी धमकी देऊन मारहाण केली़ यानंतर दुकानातून गल्ल्यातून जबरदस्तीने रोकड काढून घेतली़ या प्रकरणी इसरानी यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयित भीमनाथसह त्याच्या दोन साथीदारांवर खंडणी व जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: December 26, 2015 00:07 IST