सायखेडा : मुंबई - मनमाड डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव शिवारात फोडणाºया अज्ञात व्यक्तींंविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई - मनमाड दरम्यानची डिझेल पाइपलाइन बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास खानगाव येथे फोडण्यात आल्याने लाखो लिटर डिझेल वाया गेले आहे.या संदर्भात भारत पेट्रोलियमचे या भागातील लाईनमन ब्राह्मणे यांनी सायखेडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अंंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीरखानगाव येथे तोडलेल्या पाइपलाइनमुळे परिसरात डिझेलचे तळे साचलेले आहे. जवळच गोदावरी नदीचे पात्र असून, नदीलगतच अनेक गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी असल्याने डिझेल झिरपून विहिरीतील पाण्यात मिसळल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डिझेल पाइपलाइन फोडल्याबद्दल गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:55 IST