शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:28 IST

बेलतगव्हाण येथे युवतीच्या घराबाहेर शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दोन भावांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

नाशिकरोड : बेलतगव्हाण येथे युवतीच्या घराबाहेर शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दोनभावांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.बेलतगव्हाण येथील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरी असताना सोनू व त्याचा भाऊ मोनू बाळू दोंदे हे घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागले. युवतीने त्यांना शिवीगाळ का करता, असे विचारले असता ते दोघे हात पकडून ओढू लागले. युवतीचे वडील आले असता दोघेजण पळून गेले. या अगोदरही सोनूने युवतीच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित दोंदेबंधूविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेतजमीन व्यवहारापोटी रक्कम न देता फसवणूकनाशिकरोड : शेतजमिनी खरेदीचा व्यवहार करून जमिनीचे खरेदीखत करून त्यानंतर जमिनीचे सव्वादोन लाखांची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जेलरोड हरी विहार सोसायटीतील कैलास बाबूराव मैंद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लाखलगाव येथील ६.७५ आर इतकी शेतजमीन ओळखीचे किरण शिवाजीराव पाटील (रा. शिवकृपा, संत ज्ञानेश्वरनगर, दसक, जेलरोड) यांना विक्र ी करण्याचा व्यवहार झाला होता. किरण पाटील यांनी सदर शेत जमिनीपोटी सव्वादोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत गेल्यावर्षी आक्टोबरमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत नोंदविले होते. आमचे चांगले संबंध असल्याने मी पैसे नंतर भेटणार असले तरी खरेदीखत करून दिले होते. मात्र किरण पाटील यांनी पैसे आज उद्या देतो, असे सांगून टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मैंद यांनी सदर जमिनीचा सातबारा उतारा काढला असता किरण पाटील याने शेतजमीन अनंत अशोक मालपाणी यांना विकलेली असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संशयित किरणा पाटील यांच्याविरु द्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी