शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

मालेगावी बँक शाखेच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:53 IST

मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५०, रा.इस्लामनगर) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ठळक मुद्दे लोकांनी बाहेर जाण्यासाठी आरडाओरड सुरू केल्याने बँकेत गोंधळ उडाला

मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५०, रा.इस्लामनगर) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास एका ग्राहकाचे काउंटरवर काम न झाल्याने तक्रार करण्यासाठी बँकेचे व्यवस्थापकाकडे गेला असता व्यवस्थापकाशी वाद झाला. यावेळी सुरक्षा रक्षक शांताराम आहिरे येथे आला व ग्राहकाशी बोलू लागला. तेव्हा तू मध्ये बोलू नको असे सांगितले. याचा राग आल्याने सुरक्षा रक्षक आहिरे याने आपल्याजवळील स्प्रे काढून संपूर्ण बँकेत हवेत फवारला व बँकेचे प्रवेशद्वार बंद करून घेतले. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होवू लागला. काहींना खोकला तर जळजळ होवू लागली होती. ज्यांच्या डोळ्यात स्प्रे गेला त्यांना समोरचेही दिसत नसल्याने ते एकमेकांना धडकून पडू लागले. त्यामुळे उपस्थित वृध्द महिला, लहान मुलांसह लोकांनी बाहेर जाण्यासाठी आरडाओरड सुरू केल्याने बँकेत गोंधळ उडाला होता. या प्रकाराची माहिती समजताच एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ, नगरसेवक अयाज हलचल, राशिद अय्युब, लईक अहमद यांनी धाव घेऊन नागरिकांना शांत केले. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विषय बँकेशी संबंधित असल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी संशयित सुरक्षा रक्षक शांताराम आहिरे ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी