नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुुरुवारी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील केस मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर जातीवाचक शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार पोलिसांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.वडाळा-पाथर्डीरोड परिसरातील साईनाथनगर येथील अतुल आनंत दोंदे (३१) याने पखालरोड येथील मातोश्री कॉलनीतील गणेश राजाराम भोसले यांच्यावर १३८ एनआय कायद्यांतर्गत सरकारवाडा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याकरीता आरोपीने फिर्यादीवर दबाव आणत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्याच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त नखाते या प्रकरणाचा तपास करीत आहे.दरम्यान, सदर गुन्हा दाखल झाल्यानुसार संशयितावर प्रथम कारवाई होणार असून या गुन्ह्याच्या नियमानुसार तक्रारीत तथ्य आढळल्सास संशयितावर या कायद्यान्वये शिक्षादेखील होऊशकते़
जुन्या भांडणातून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:09 IST