ब्राह्मणगाव : नुकत्याच केंद्रीय अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत वर्षकाठी शेतकºयांना सहा हजार रूपयांची मदत शेतक-यांच्या बँक खात्यावर देण्यात येणार आहे. सद्या सर्व शेतकरी हा अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी करत आहेत. शेतकºयांच्या अर्जासोबत आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर, , जन्म तारीख,जातीचा उल्लेख , गट नंबर,ही कागदपत्र जोडण्यात येत आहेत. कांदा अनुदानासाठी ही शेतकºयांनी सर्व कागदपत्र जोडून बाजार समितीकडे दाखल केली आहेत. सद्या शेतकरी या सोबत दुष्काळ ग्रस्त मदतीची प्रतिक्षा करत आहेत. दुष्काळी परिस्थिती आता घर करू लागली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी दोन हेक्टरची मर्यादा केली आहे. तेव्हा दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी वंचित राहू नये म्हणून ही मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी करत आहेत.तसेच कांदा अनुदानही लवकर देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
किसान सन्मान निधी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 12:54 IST