अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:24+5:302021-02-05T05:37:24+5:30

केंद्र सरकारकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरने शाळेचे लॉगिन आयडी तयार करून शिष्यवृत्तीवर ...

File charges against the culprits in the minority scholarship case | अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करा

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करा

केंद्र सरकारकडून धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरने शाळेचे लॉगिन आयडी तयार करून शिष्यवृत्तीवर डल्ला मारल्याचे वृत्त लोकमतने गुरुवारी (दि.२८) प्रकाशित केले होते. या वृत्ताची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी (दि.२९) नाशिक दौऱ्यावर असताना शिक्षण उपसंचालक कार्यालयात भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले. त्याचप्रमाणे कोविड पश्चात जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांची माहिती घेतानाच विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांच्या चाचण्या, कोरोना बाधित शिक्षकांची संख्या याविषयीही त्यांनी चौकशी केली. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षकांच्या तक्रार निवारणाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: File charges against the culprits in the minority scholarship case