लेंडाणेत शेडच्या मालकी हक्कावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST2021-02-11T04:15:35+5:302021-02-11T04:15:35+5:30

मंगळवारी (दि. ९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मन्साराम यादवराव शेवाळे (६३, रा. लेंडाणे) यांनी फिर्याद ...

Fighting over ownership of a shed in Landane | लेंडाणेत शेडच्या मालकी हक्कावरून हाणामारी

लेंडाणेत शेडच्या मालकी हक्कावरून हाणामारी

मंगळवारी (दि. ९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मन्साराम यादवराव शेवाळे (६३, रा. लेंडाणे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी बाळू यादवराव शेवाळे, दत्तू बाळू शेवाळे, प्रवीण बाळू शेवाळे, नंदाबाई लक्ष्मण शेवाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी व संशयित हे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादीच्या नावावरील पत्र्याच्या शेडच्या मालकी हक्कावरून कुरापत काढून आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. अनिता अनिल शिंदे या भांडण सोडविण्यास आल्या असता त्यांनादेखील बाळू शेवाळे याने चाकू मारून दुखापत केली. तसेच फिर्यादीस ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक एस. बी. बच्छाव करीत आहेत.

Web Title: Fighting over ownership of a shed in Landane