शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
4
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
5
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
6
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
7
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
8
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
9
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
10
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
11
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
13
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
14
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
15
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
16
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
17
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
18
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
19
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
20
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
Daily Top 2Weekly Top 5

विषमतेविरूद्ध समतेचा लढा :  प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:48 IST

कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून समोर आले.

नाशिक : कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून समोर आले. विषमतावादा विरूद्ध समतेची ही निर्णायक लढाई असून स्वातंत्र्यदिनानंतर मोदींची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, असा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा मेळाव्यात पुकारला.  ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पवन पवार, खंडेराव पाटील, किशोर दमाळे, अ‍ॅड. विजय मोरे, बाजीराव तिडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव यांसह विविध बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी समाजबांधवांनी ‘बोलो-बोलो जय भीम’चा नारा बुलंद करत अवघे सभागृह दणाणून सोडले. यावेळी आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांचे होणारे भाषण हे महत्त्वाचे असते.  त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील अन् देशातील वातावरण अस्थिर करण्याचा आमचा हेतू नाही; मात्र स्वातंत्र्यदिनानंतर भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊ. मोदींनी या देशातील शेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे आहे; कारण या सरकारने अंदाजपत्रकात अन्नधान्य खरेदीसाठी तशी कुठलीही तरतूद केलेली नाही. जेव्हा या देशातील शेतकºयांना हे लक्षात येईल, की सरकारने रंगविलेले हमीभाववाढीचे स्वप्न भंगले आहे, तोपर्यंत केंद्राकडून लोकसभेची निवडणूक जाहीर केली जाईल, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून आश्वासनांची खैरात आणि विषमता पोसणारे मनुवादी व्यवस्थेला खतपाणी घालणारे सरकार उधळून लावण्याचे महत्त्वाचे कार्य बहुजनांना करायचे असल्याचे अवाहन त्यांनी यावेळी केले.या राज्यात अन् देशात विषमतेला सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले यांनी सुरुंग लावला. त्यानंतर पुन्हा विषमता आणि मनुवादी व्यवस्थेच्या विचारसरणीने डोके वर काढले आहे. ही व्यवस्था उधळून लावण्यासाठी समतेचा हा विषमतेविरुद्धचा हा अखेरचा मोठा लढा असणार आहे. यामुळे सर्व वंचित समाजघटकांनी एकत्र येऊन सत्ता काबीज करण्यासाठी एकजुटीची ताकद पणाला लावावी.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर