शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

पावणे पाच लाखांना गंडा; फसवणुकीचा आधुनिक फंडा

By admin | Updated: July 13, 2017 22:52 IST

आॅनलाइन बाजाराच्या एका वेबसाइटवरून विविध वस्तूंच्या खरेदी एका ग्राहकाला ‘महाग’ पडली आहे.

नाशिक : आॅनलाइन बाजाराच्या एका वेबसाइटवरून विविध वस्तूंच्या खरेदी एका ग्राहकाला ‘महाग’ पडली आहे. या खरेदीनंतर संबंधित ग्राहकाला सदर संकेतस्थळाच्या संदर्भ देत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत भामट्याने त्यांना आमिष दाखवून तब्बल चार लाख ७४ हजार ३१५ रुपयांना गंडा घातला आहे. फसवणुकीच्या आधुनिक फंड्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलेश बालाजी मंडलिक यांनी ‘किथी’ नावाच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन खरेदी केली होती. यामध्ये घड्याळ, गॉगल, टी-शर्ट आदि वस्तूंचा समावेश आहे. खरेदीचा व्यवहार पूर्ण होत नाही तोच त्यांना एका निनावी भ्रमणध्वनीवरून कॉल आला. त्या कॉलवरून संबंधिताने मंडलिक यांचा विश्वास संपादन करत त्यांना, तुमची अमेझ कार कॉन्टेस्टमध्ये निवड झाल्याचे सांगून काही रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर मंडलिक यांनी वेळोवेळी रक्कम जमा करत एकूण ४ लाख ७४ हजार ३१५ रुपयांची गुंतवणूक केली. रक्कम गुंतवूनदेखील कुठल्याही प्रकारची कार मिळाली नाही आणि संबंधित भामट्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले. वेबसाइटवरून आॅनलाइन खरेदीनंतर फसवणूक झाल्याची फिर्याद त्यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे. यानुसार पोलिसांनी मोबाइल फोनचे सीडीआर, एसडीआर, आय.पी.अ‍ॅड्रेस व ई-मेलच्या आयपी अ‍ॅड्रेसद्वारे ट्रेस लावण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलीस स्वतंत्ररीत्या याचा तपास करत असून, संशयित भामट्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली आहे.