शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कळवण नगरपंचायतीकडून पाच वर्षांत पन्नास कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:44 IST

कळवण : कळवणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात नगरपंचायतच्या सत्तेची सूत्रे दिली. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत ५० कोटी रुपयांची सार्वजनिक विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. यापुढेही कळवण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.

ठळक मुद्देनितीन पवार : कार्य वचनपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन

कळवण : कळवणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात नगरपंचायतच्या सत्तेची सूत्रे दिली. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत ५० कोटी रुपयांची सार्वजनिक विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. यापुढेही कळवण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नितीन पवार यांनी दिली.नगरपंचायतच्या माध्यमातून कळवण शहरातील ५ वर्षांच्या लोकाभिमुख कार्याची वचनपूर्ती दर्शविणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते व नगराध्यक्षा रोहिणी महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आमदार नितीन पवार यांनी सांगितले, गेल्या ५ वर्षांत सार्वजनिक विकासकामांना प्रथम प्राधान्य दिले, त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यात यश आले. शहरातील भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजना, नगरपंचायत प्रशासकीय इमारत, शहरांतर्गत भूमिगत वीजवाहिनी योजना, अग्निशमन वाहन, बगीचा यासह अंतर्गत रस्ते आदी कामे शासनस्तरावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, काही कामांना मंजुरी मिळाली असल्याचेही आमदार पवार यांनी सांगितले. शिवाय कळवण परिसरातील सिंचनासाठी गिरणा नदीवर बंधारे बांधणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, कळवण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बेबीलाल संचेती, कमको संचालक प्रा. निंबा कोठावदे, योगेश मालपुरे, ज्येष्ठ नेते कारभारी पगार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार काशीनाथ बहिरम, गटनेते कौतिक पगार धनंजय पवार, अशोक पवार, नारायण हिरे, कारभारी आहेर,बाबुलाल पगार, देवराम पगार, ॲड. परशुराम पगार, डॉ. पोपट पगार, राजेंद्र भामरे, महेंद्र हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते, सूत्रसंचालन व प्रास्ताविक राकेश हिरे यांनी केले तर आभार राजेंद्र भामरे यांनी मानले.पहाटेच्या शपथविधीचे किस्सेआमदार नितीन पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या सोहळ्याचे खुमासदार किस्से सांगत उपस्थितांना पोटधरून हसविले. याचवेळी कळवण नगरपंचायतच्या माध्यमातून विकासकामांच्या निमित्ताने स्व. ए. टी. पवार यांची आठवण झाल्याचे सांगून त्यांना काही काळ गहिवरून आले.

टॅग्स :MLAआमदारGovernmentसरकार