शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला पंधरा स्थलांतरित कुटुंबांना शिधा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 18:03 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला.

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला.सिन्नर-शिर्डी मार्गावरील कुंदेवाडी फाट्यावर जालना जिल्ह्यातील ११ गोसावी कुुटुंबे पाल टाकून राहतात. या कुटुंबातील ३५-४० सदस्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती युवा मित्रचे कार्यकारी संचालक सुनील पोटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. नांदूरशिंगोटे येथील रोजगार मिळणे बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात या कुटुंबानी फाट्यावर पाल ठोकले आणि कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यामुळे झोपड्यांमध्येच अडकून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. विजयनगरमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज भंडारी यांच्या किराणा दुकानात अत्यावश्यक वस्तूंची यादी पोहोचविण्यात आली. एका कुटुंबासाठी लागणारा किराणा त्यांनी गोणीत भरून दिला. देवनदीच्या काठावर पाल टाकलेल्या ४ कुटुंबांना व मुसळगाव वसाहतीतील एटलस फाईन केमिकल्सच्या झारखंड व बिहारमधील १४ कुटुंबांतील ६४ सदस्यांनाही किराणा माल पोहोचविण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, विलास नाठे, रतन माळी, संताजी जगताप, ग्रामविकास अधिकारी पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.रेवा फार्मा कंपनीकडून २२ हजार ५०० रु पयांचा धनादेशरोजगारासाठी परिसरात स्थलांतरीत झालेल्या १५-२० कुटुंबांची युवा मित्रमुळे माहिती झाली आणि त्याच्यातील कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये या भावनेतून या उपक्र मात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. गावातील १५ कुटुंबांच्या किराणाचा खर्च उचलण्याची तयारी रेवा फार्मा कंपनीने दाखवत २२ हजार ५०० रु पयांचा धनादेश युवा मित्रकडे सुपुर्द केला. या उपक्र माला मदतीसाठी मुसळगाव वसाहतीतील अनेक कंपन्या पुढे येत असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाची भूक भागविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक