शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांच्या विलंबाने पंधरा उमेदवार मुकले स्टाफ सिलेक्श्न परीक्षेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 22:16 IST

आयऑन डिजिटल झोन येथे ४ ते ९ मार्च या कालावधीत स्टाफ सिलेक्शन परीक्षा सुरू असून, याठिकाणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरातून व परिसरातून अनेक उमेदवार परीक्षा देण्यासाठी येतात या स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.५) जवळपास १५ उमेदवारांना अल्पशा विलंबामुळे परीक्षेला मुकावे लागले.

नाशिक : स्टाफ सिलेक्शन स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.५) जवळपास १५ उमेदवारांना अल्पशा विलंबामुळे परीक्षेला मुकावे लागले. विशेष म्हणजे या उमेदवारांमध्ये निश्चित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या एका महिला उमेदवाराचा समावेश असून, ही महिला तिच्या ओळखपत्रावर जन्मतारीख नमूद नसल्याने दुसरे ओळखपत्र घेण्यासाठी बाहेर पडली होती. परंतु तिलाही पुन्हा परीक्षा कें द्रात सोडण्यात न आल्याने परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. इंदिरानगर-वडाळा परिसरांतील आयऑन डिजिटल झोन येथे ४ ते ९ मार्च या कालावधीत स्टाफ सिलेक्शन परीक्षा सुरू असून, याठिकाणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरातून व परिसरातून अनेक उमेदवार परीक्षा देण्यासाठी येतात. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागापासून हे परीक्षा केंद्र काहीसे दूर असून, या भागात पोहोचण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध नसल्याने अनेक उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याचे प्रकार घडतात. अशा उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे परीक्षेचे सुल्क अदा करून सर्वप्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एक किंवा दोन मिनिटांच्या विलंबाने पोहोचल्यामुळे परीक्षेची संधी गमवावी लागते. असाच प्रकार गुरुवारी (दि.५) आयऑन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रावर घडला असून, याठिकाणी सुमारे १५ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्याची माहिती येथे परीक्षेसाठी आलेल्या एका परीक्षार्थीने दिली आहे. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी या उमेदवारांना केवळ एक ते दोन मिनिटांचा विलंब झाला होता. तरी त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करताना परीक्षा पद्धती आणि नियोजनात परिस्थितीचा विचार करून बदल करण्यासोबत संधी चुकलेल्या परीक्षार्थींना दुसऱ्या दिवशी अथवा अखेरच्या दिवशी परीक्षेची पुन्हा संधी देण्यात यावी, अशी मागणी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांनी केली आहे.  

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिक