शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाहन शोरुमच्या वर्कशॉपला भीषण आग; सात बंबाच्या सहाय्याने जवानांनी मिळविले नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 21:25 IST

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फायरमन जवान शर्थीचे प्रयत्न करत आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणत होते.

ठळक मुद्देवर्कशॉपमधील बॅटऱ्यांमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किटसुदैवाने शोरुम बंद झाल्यानंतर आगीचा भडका

नाशिक : येथील पाथर्डीफाटा येथील एका चारचाकी वाहनाच्या शोरुमला गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची सुरुवात वाहन शोरुमच्या वर्कशॉपपाासून झाली. रात्री पाऊस सुरु असतानाही क्षणार्धात आगीने रौद्रावतार घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सात बंबाच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा फायरमन जवान शर्थीचे प्रयत्न करत आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आणत होते.पाथर्डीफाटा येथील 'जितेंद्र सर्व्हिसेस' नावाच्या शोरुमच्या पाठीमागे असलेल्या वर्कशॉपमधील बॅटऱ्यांमध्ये अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घटनेची माहिती शोरुममधील सुरक्षारक्षकांकडून तातडीने अग्निशमन दलाला कळविवण्यात आली. तातडीने सर्वप्रथम लेखानगर येथील सिडको उपकेंद्राचे दोन बंब एकापाठोपाठ घटनास्थळी पोहचले. या बंबांवरील जवानांनी आग विझविण्यास सुरुवात केली; मात्र आगीने रौद्रावतार धारण केल्यामुळे अतिरिक्त मदतीचा 'कॉल' अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला घटनास्थळावरुन दिला गेला. त्यामुळे तत्काळ शिंगाडा तलाव मुख्यालयातील २, सतपूर, नाशिकरोड, विभागीय केंद्र कोणार्कनगर यांचे प्रत्येकी एक असे एकूण ७ बंब घटनास्थळी पोहचले. यामध्ये एक मेगाबाऊजर व दोन बाऊजर बंबाचाही समावेश होता. अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविणे जवानांना शक्य झाले. सुदैवाने शोरुम बंद झाल्यानंतर आगीचा भडका उडाल्यामुळे जिवीतहानीचा धोका टळला. कारण यावेळी वर्कशॉप परिसरात कोणतेही कामगार कार्यरत नव्हते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत वाहन शोरुमच्या मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात होता. 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात