शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सावकारी व्यवहारातून तरुणावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: January 14, 2017 00:59 IST

फुलेनगर : शस्त्राने वार; तरुण जखमी

 पंचवटी : व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुरापत काढून पेठरोडवरील फुलेनगर (भराडवस्ती) येथे राहणाऱ्या युवकावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना शुक्र वारी दुपारी घडली आहे. या घटनेत चंदू विष्णू सावंत हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय $$्निरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भराडवस्तीत राहणाऱ्या चंदू सावंत याने काही दिवसांपूर्वी परिसरातील संशयित आरोपी शरद लोखंडेकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. सावंत याने व्याजाने घेतलेली रक्कम परत मिळावी यासाठी संशयित लोखंडे याने तगादा लावला होता. सावंत शुक्र वारी दुपारी परिसरात दिसताच संशयित शरद लोखंडे, प्रेम शिंदे व कपिल शिंदे अशा तिघा संशयितांनी सावंत याला रस्त्यात अडविले. संशयितांच्या हातात धारदार शस्त्र असल्याने सावंत याने जीव वाचविण्यासाठी पळ काढला. त्यावेळी संशयितांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व हातातील धारदार शस्त्राने वार केला. त्यात सावंत याच्या कानाला, गालावर व हातावर घाव लागल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणातील तिन्ही संशयित आरोपींविरोधात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)