शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरिपावर खतांच्या भाववाढीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:54 IST

खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना मार्च-एप्रिल महिन्यांत खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरूच असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

नाशिक : खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना मार्च-एप्रिल महिन्यांत खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरूच असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.  खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फॉस्फेरिक अ‍ॅसिडची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या खतनिर्मिती कंपन्यांची कच्च्या मालाची आयात महागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीच्या झळा थेट सर्वसाधारण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचल्या असून, खरिपाला आता खाद्य देण्याची गरज असताना खतांच्या किमतीत जवळपास १०ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी प्रमुख्याने वापर केल्या जाणाºया डीएपी खताच्या किमतीत एका बॅगमागे ३१ मार्चनंतर जवळपास २१० रुपयांनी वाढ झाली आहे, तर वेगवेगळ्या वर्गवारीतील एनपीके खतांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात झाली आहे. यातील १०-२६-२६च्या एका बॅगच्या मार्चमधील १०६० ते ७० रुपये असलेल्या किमती एप्रिल महिन्यात ११८६ रुपयांपर्यंत वाढल्या असून, यात जवळपास ११० रुपये वाढ झाली आहे. २४-२४-१० च्या किमतीतही १८५ रुपयांनी वाढल्या असून, १२-३२-१६ च्या किमती १२२ रुपयांनी वाढल्या आहेत. युरियाच्या किमतीत सध्याच्या स्थितीत फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसत नसले तरी युरियाच्या पॅकिंगचे वजन कमी करण्यात आले आहे. पूर्वी २९५ रुपयांना ५० किलोग्रॅमच्या पॅकिंगमध्ये येणारी युरियाची पिशवी आता ४५ किलोची करण्यात आली असून, ती २६५ ते २७५ रुपयांना मिळत आहे.  खतांची पुरेशी उपलब्धता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना खतांची टंचाई जाणवू नये यासाठी बाजारपेठेत मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्यात आली असून, यात मेरीट आॅफ पोटॅश (एमओपी) वर्गातील खतांसह, डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आदी विविध प्रकारची खते सध्या उपलब्ध आहेत. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली आहे. त्यामुळे शेतक-यांकडून खतांची उचल घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी