शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

मेथी, कोथिंबीर आली ५ रुपये जुडीवर; आवक वाढल्याचा परिणाम, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By संजय दुनबळे | Published: August 05, 2023 3:12 PM

बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून शेतमालाची आवक वाढली आहे.

पंचवटी : पंधरवड्यापूर्वी वाढत्या बाजारभावामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या मेथी तसेच कोथिंबीरची मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार घसरले असून गुरुवारी (दि.३) लिलावात आलेल्या शेतमालाला ५ रुपये प्रति जुडी बाजारभाव मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तर उत्पादक शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने शेतातील पीक काढणे सोपे झाले आहे. शिवाय पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने मेथी आणि कोथिंबीर मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून शेतमालाची आवक वाढली आहे. मात्र बाजारभाव घसरल्याने लागवड दळणवळण खर्च देखील न सुटल्याने काही शेतकऱ्यांनी काल बुधवारी (दि.२) सायंकाळी बाजार समितीत मेथी, कोथिंबीर काही माल सोडून घराकडे मार्गक्रमण केले.

गुरुवारी सायंकाळी बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झालेल्या मेथी आणि कोथिंबीर प्रति जुडीला ५ ते २० रुपयांपर्यंत दर मिळाला, तर कांदापात आणि शेपू भाजीचे दर टिकून होते. लिलावात शेपू १५, तर कांदापात २५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.