शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त महिलांचा व्हॉल्वमनला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:09 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्यास घेराव घातला.सदिच्छानगर परिसरात सुमारे हजार लोकांची वस्ती आहे. नोकरदार व कामगारांची वस्ती म्हणून तिची ओळख आहे. या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी महिलावर्गाकडून भरले जात नसल्याने वापराचे पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्याला घेराव घालून जोपर्यंत अधिकारीवर्ग येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत न सोडण्याचा निर्णय घेतला होता. अखेर अधिकाऱ्यांनी मोबाइल स्विच आॅफ केल्याने व्हॉल्वला सोडून देण्यात आले.यावेळी नीलेश साळुंखे, बाळासाहेब काळे, अशोक ठाकरे, नितीन पाटील, धनराज गायकवाड , सुगंधा भोये, साखरबाई त्रिभुवन, नंदा गायकवाड, सुरेखा महाले, प्रतिभा पाटील, अरु णा अवतारे, वंदना दवते, ललिता पितलेवर, सविता लोंढे, आशा उदमले, मंगल उदमले , सरला निकम, मेघा भोये, सरस्वती मोरे, रेणुका गाडेकर, सविता क्षीरसागर, कलावती मोरे, रेखा बोरसे, सुनंदा भोळे, उषा गुंजाळ, रेणुका गाडेकर, जयश्री गावडे, विमल बोरसे, राणी डाखुरे, योगीता गावडे, वंदना काळे, मीना गुंजाळ, मनीषा वाघ, सुनीता क्षीरसागर, सुलोचना पाटील, सुवर्णा पाटील, पार्वती सावंत आदींसह इंदिरानगर परिसरातील महिला उपस्थित होत्या.पाण्यासाठी महिलांची पायपीटदिवसागणिक वाढणाºया उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात परिसरातील महिला वर्गासह बालगोपाळ पायपीट करत उन्हाचा तडाखा सहन करत आव्हाड मळ्याच्या विहिरीतून पाणी भरत आहेत. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्याला घेराव घातला़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीWomenमहिला