शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

माणुसकीला काळीमा! 'नकोशी'ला चक्क घंटागाडीतून पोहचविले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

By अझहर शेख | Updated: October 29, 2022 12:53 IST

नाशिकच्या खत प्रकल्पामध्ये सापडले स्त्री जातीचे अर्भक!

नाशिक : एकीकडे 'बेटी बचाव बेटी पढाव...' चा नारा बुलंद केला जात असताना नाशिकच्या खत प्रकल्पामध्ये पुन्हा एकदा एका 'नकोशी'ला टाकून अज्ञात महिलेने पळ काढण्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका स्त्री जातीचे अर्भक चऱ्याच्या ढिगार्‍यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कचरा वेचणाऱ्या कामगारांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळविली.

महिला सबलीकरणासठी तसेच विवाहितांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विविध प्रयत्न होत आहे. गर्भपातलादेखील न्यायालयाने 'हिरवा झेंडा' दाखविला आहे. अविवाहित महिलासुद्धा गर्भपात करून घेऊ शकते, असे न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही अवैधरित्या अशाप्रकारे बाळांना जन्माला घालून असे बेवारसपणे उघड्यावर फेकून देण्याचे प्रकार घडतच आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने गौळाणे खत प्रकल्पातील कचऱ्यात सापडलेल्या अर्भक कोणत्या घंटागाडीत कोणी टाकले याच्या तपासाला पोलिसांनी गती दिली. दिवाळीचे लक्ष्मीपूजन होऊन चार दिवस उलटत नाही तर स्त्री जातीचे अर्भक खत प्रकल्पातील कचऱ्यात सापडल्याने गौळाणे, पाथर्डी फाटा, इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत क्रूर व अमानवी अशा या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी (दि.28) सकाळी खत प्रकल्पाच्या कचऱ्यात कचरा गोळा करताना एका प्लास्टिकच्या पिशवीत कापडमध्ये गुंडाळून ठेवलेले स्त्री जातीचे अर्भक सापडले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. त्यानुसार सकाळी शहरातून कोण-कोणत्या भागातून कचरा संकलन करून घंटागाड्या खत प्रकल्पात आल्या? याबाबतची माहिती मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनकडून पोलीस घेत आहेत. घंटागाडीवरील कामगारांची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक