शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

कृतज्ञतेच्या नमस्काराची पंचविशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:31 AM

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.

धनंजय वाखारे ।नाशिक : नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर त्यांच्या हयातीतच २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानमार्फत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९१पासून ‘जनस्थान’, तर १९९२पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार सुरू करण्यात आले. एक वर्षाआड देण्यात येणाºया या पुरस्कारांची योजना आजही अखंडपणे त्यांच्या अनुयायांमार्फत सुरू आहे. त्यात, गोदावरी गौरव हा पुरस्कार नसून तो कृतज्ञतेचा नमस्कार आहे, असे खुद्द कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवल्याने एक वर्षाआड लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प या सहा प्रकारांतील मान्यवरांची निवड करून त्यांना गौरविण्यात येते. १९९२ आणि १९९४ मध्ये चित्र-शिल्प ही वर्गवारी नव्हती. १९९६ पासून चित्र-शिल्प या वर्गवारीचा समावेश करण्यात आला. गेल्या २५ वर्षांत १३ वितरण सोहळे पार पडले आहेत. एका वर्षी जनस्थान आणि एका वर्षी गोदावरी गौरव सोहळा हा नाशिककरांसाठी मोठी मेजवानी ठरत आलेला आहे. अनेक मान्यवरांना त्यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळालेली आहे. आतापर्यंत गंगुबाई हनगल, अभिनेता अशोककुमार, डॉ. वसंत गोवारीकर, जे. एफ. रिबेरो, श्रीमती रोहिणी भाटे, गुलजार, डॉ. जयंत नारळीकर, पॉली उम्रीगर, अण्णा हजारे, सुधीर फडके, ऋषिकेश मुखर्जी, माधव सातवळेकर, किशोरी अमोणकर, भक्ती बर्वे- इनामदार, आर. के. लक्ष्मण, कॅप्टन रमेश शर्मा, पंडित सत्यदेव दुबे, प्रभा अत्रे, पंडित बिरजू महाराज, श्रीमती सुलोचना, राम सुतार, रवि परांजपे, रघुनाथ माशेलकर, श्रीपती खंचनाळे, मृणाल गोरे, विजया मेहता, शाहीर साबळे, अब्दुल जब्बार खान, बाबा आढाव, अदूर गोपालकृष्णन, प्रवीण ठिपसे, धनराज पिल्ले, इसाक मुजावर, मोहन आगाशे, सुहास बहुलकर, अनिल अवचट, नाना पाटेकर, कनक रेळे, शशिकुमार दोशी यांसारख्या नामवंतांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे.  गोदावरी गौरवसाठी यापूर्वी ११ हजार रुपये व मानचिन्ह दिले जायचे. त्यात आता रोख रकमेत वाढ करून २१ हजार रुपये व मानचिन्हाचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च २०१८ मध्ये देण्यात येणाºया गोदावरी गौरवसाठी निवडप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. गोदावरी गौरवच्या या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त प्रतिष्ठानकडून निश्चितच मान्यवरांना जरा हटके कृतज्ञतेचा नमस्कार केला जाईल, अशी आशा बाळगूया. तिघा नाशिककरांचा समावेश जनस्थान पुरस्काराची योजना सुरूझाल्यानंतर आतापर्यंत केवळ बाबूराव बागुल या नाशिककर साहित्यिकालाच ‘जनस्थान’चा बहुमान मिळू शकलेला आहे. २००७ मध्ये बागुल यांना जनस्थानने सन्मानित करण्यात आले होते, तर गोदावरी गौरवही २०१४ पर्यंत नाशिककरांच्या वाट्याला आलेला नव्हता. मागील वर्षी २०१६ मध्ये झालेल्या सोहळ्यात अमेरिकेतील रॅम स्पर्धेत मराठी झेंडा रोवणारे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन यांना क्रीडा, साहस या प्रकारांत गोदावरी गौरव प्रदान करण्यात आला होता. महाजन बंधूंच्या रूपाने पहिल्यांदाच नाशिककरांना कृतज्ञतेच्या नमस्काराची प्रत्यक्षानुभूती घेता आली.

टॅग्स :Nashikनाशिक