शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

नामपूरला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By admin | Updated: March 22, 2017 00:21 IST

नामपूर : येथे श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रतिष्ठान व नामपूर लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांच्या विद्यमाने महिलांचा गौरव सोहळा घेण्यात आला.

नामपूर : येथे श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रतिष्ठान व नामपूर लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील गुणवंत ११ महिलांचा गौरव सोहळा, स्नेहमेळावा व सांस्कृतिक महोत्सव असा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी विठामाई रामकृष्ण अलई होत्या. या सोहळ्यात महाराष्ट्र व गुजरात राज्यातील महिलांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे स्वरूप व उद्दिष्ट प्रतिष्ठानच्या सरचिटणीस स्नेहलता नेरकर यांनी विशद केले. या महोत्सवात मुंबई, पुणे, डोंबिवली, नाशिक, सूरत, कळवण, मालेगाव, निजामपूर, पिंपळनेर, सटाणा, नामपूर व जायखेडा येथील महिलांनी सहभाग नोंदवला. या महिला मेळाव्यात सांस्कृतिक महोत्सवाबरोबरच लग्नासमारंभातील अनिष्ट चालीरीती, हुंडापद्धती, व्यापार व शेतीक्षेत्रातील मुलांकडे वधुपित्याचे होणारे दुर्लक्ष व त्याचे अनिष्ट परिणाम या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात महाराष्ट्रातील ११ गुणवंत महिला प्रा. विमल वाणी, डॉ. सौ. उषा बागडे, प्रा. रत्ना दहिवेलकर (पुणे), रत्नमाला राणे (नाशिक), साधना राणे (निजामपूर), पूनम ततार, कमल नेर, सविता नेर, रेखा मालपुरे (डोंबिवली), रजनी राणे यांचा आमदार दीपिका चव्हाण व सीमा सोनजे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  याप्रसंगी महिलांनी अधिक सक्षम होऊन नवीन प्रवाहात स्वत:ला जुळवून घेऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन आमदार दीपिका चव्हाण यांनी केले. या महोत्सवात ३१८ महिलांनी विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला, तर ८४५ स्त्रियांनी या स्नेहमेळाव्यातील विविध चालीरीतीवरील चर्चेत सहभाग घेतला. गुजरात राज्यातील सूरतच्या महिला मंडळाने गरबा नृत्य सादर करून ‘वन्स-मोअर’ मिळविला, तर नामपूर, पिंपळनेर, जायखेडा, मालेगाव येथील सांस्कृतिक महोत्सवातील गीते मनोवेधक ठरली.  या कार्यक्रमात आमदार दीपिका चव्हाण, नाशिकच्या नगरसेवक रत्नमाला राणे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा सोनजे, पूनम ततार, स्नेहलता नेरकर, उषा बागडे आदिंनी महिलांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)