नाशिक : जुने नाशिकमधील ११ उर्दू व मराठी शाळांमधील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब गंजमाळ येथे फैज बँकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नीट परीक्षेत पात्रता प्राप्त करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त एम. एम. अशरफ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, बँक असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, भास्कर कोठावदे, एचएएल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मन्सूर शेख, नगरसेवक समीना मेमन, आशा तडवी, माजी नगरसेवक रईस शेख, गुलजार कोकणी, अन्वर गौरी, नासिर शेख, रमजान कोकणी, हाजी सलीम पटेल, अॅड. सय्यद आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष अॅड. अन्सार सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ शेख यांनी केले. फारुक शेख यांनी आभार मानले. यावेळी आसिफ सय्यद, फिरदौस शेख आदी उपस्थित होते.
उर्दू व मराठी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:09 IST