शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:53 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .

ठळक मुद्देअफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांनाच.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ कडक निर्बंध होते. त्यामुळे जनसामान्यांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळल्याने हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. सर्व सुरळीत झाले.

त्या आर्थिक संकटातून सगळे सावरू लागले असताना पुन्हा एकदा त्याचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा ,गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, रात्रीची संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी आदी निर्देश शासनाकडून दिले जात आहेत. मात्र पुन्हा पहिल्यासारखे कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्या खोट्या बातम्या, एडिट केलेले ऑडिओ सोशल मीडिया माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी,मजूर कामगार, गोरगरीब नागरिकांची धास्ती वाढली. पुन्हा पहिल्यासारखे लॉकडाऊन झाले तर काय परिस्थिती होणार याचा विचार करीत शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल भावात विकू लागला आहे .कामगार, मजूर, नोकरदार हे पुन्हा बेरोजगार होणार ही भीती वाढली आहे. त्यामुळे या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे.लॉकडाऊनच्या अफवांमुळे शेतकरी, दुकानदार ,बांधकाम मजूर, नोकरदार या प्रत्येकाला याचा फटका बसणार आहे. त्यातच मजूर व नोकरदार वर्गाचे पेमेंट अडवले जात असून त्यातही कपात केली जात आहे. कामावरून काढून टाकण्याचे दम भरले जात आहेत. या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे त्यामुळे अफवा पसरवणे टाळावे आणि प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे पीक मातीमोल केले आणि त्यात आता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या अफवेची भीती यात व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. पुन्हा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या षडयंत्राला द्राक्ष उत्पादक बळी पडत आहेत.- अजय गवळी, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती