शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

गोदावरी नदीपात्रात दोघेजण बुडाल्याची भीती? मनपा अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 20:23 IST

बुधवारी दिवसभर पाऊस पडल्याने रात्री गोदावरी नदीला पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

पंचवटी (नाशिक): गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या गोदावरी नदीपात्रा तील गौरी पटांगण येथे गुरुवारी (दि.28) सायंकाळी गणेश विसर्जनासाठी आलेले दोघे भाविक सव्वा सात वाजेला पाण्यात बुडाल्याची चर्चा पसरल्याने पंचवटी अग्निशमन दलाच्या जवा नांनी तत्काळ पाण्यात बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू केले होते. 

बुधवारी दिवसभर पाऊस पडल्याने रात्री गोदावरी नदीला पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी (दि.28) सकाळपासूनच पावसाने उघडीप दिल्यानंतर गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नदीकाठच्या परिसरात दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या पावसाने गुरुवारच्या दिवशी दुपारपर्यंत गोदावरी नदी खळखळून वाहत होती मात्र सायंकाळच्या वेळी पूरसदृश परिस्थिती कमी झाल्याने अनेक भाविक उत्साहाच्या भरात थेट नदी पात्रात मूर्ती विसर्जनासाठी उतरत होते.

गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजेला गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या गौरी पटांगण येथील नदीपात्रात दोघे गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जन करत असताना पाण्यात बुडून वाहून गेल्याची चर्चा पसरल्याने पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्यात बोट उतरवून वाहत्या पाण्यात कोणी वाहून गेले की नाही याचा शोध सुरू केला होता रात्री आठ वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होते मात्र तो पावतो अग्निशमन दलाच्या हाती काहीही न लागल्याने नदीपात्रात कोणी बुडाले की नाही याबाबतची कोणतीही स्पष्टोक्ती नव्हती मात्र दोघेजण बुडाल्याची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे