शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:50 IST

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : पाणीटंचाईमुळेही होणार परिणाम

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालू वर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकणीपर्यंत व लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र त्या वेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगवण्याआधीच खराब झाली होती. परिणामी दुसऱ्यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती; परंतु बहुतांश कंपनीचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करीत कशाबशा लागवडी पूर्ण केल्या. मात्र, उन्हाळी कांदे म्हणून लागवड केलेले बहुतांश कांदे लाल निघाल्याने उन्हाळी कांद्यांचे क्षेत्र आपसूकच कमी झाले. त्यानंतर उर्वरित उन्हाळी कांदा पीक जोमात असताना गेल्या तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून काहीअंशी वाचलेल्या कांद्यांचे उत्पादन तरी पदरात पडेल अशी अपेक्षा असतानाच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसांतच करपा रोगाने थैमान घातले आहे.उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन कांदा काढणीच्या महिनाभर आधीच विहिरींनी तळ गाठल्याने कमी चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी, आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी हा कांदा बाधित झाल्याने चाळीत साठवणुकीऐवजी विक्री करावा लागणार आहे.- संभाजी देवरे, शेतकरीकांद्याची प्रतवारी घसरलीमागील वर्षी उन्हाळी कांद्यांचे उत्पादन चांगले असल्याने सुरुवातीस कमी बाजारभावाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी आगामी काळात भाव मिळेल या अपेक्षेपोटी कांदा माल चाळींमध्ये साठवणूक केला होता. मात्र या वर्षी ऐन कांदा गळतीवेळी बहुतांश ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शिवाय करपा रोग व नंतर पाणीटंचाई, आदी कारणांमुळे उत्पादनात काही अंशी घट येण्याची शक्यता असून, कांद्यांची प्रतवारी घसरल्याने चाळींमध्ये कांदा साठवणुकीवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा