शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:09 IST

दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देबियाणांची टंचाई : बळीराजावर चिंतेचे सावट

दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे.सध्या शेतकरी वर्गाला कांदा पिकं घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्यात अथवा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांची मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागत आहे. यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत,कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडल्यामुळे कांदा पिकांचे रोपे यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने कांदा हंगामासाठी रोपे मिळविणे अंत्यत अवघड होऊन बसले आहे.बरीच ठिकाणे शेती पिकाची स्थिती पाऊस, वातावरणातील बदल, कोरोना ची स्थिती यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही पिकांची रोपे अथवा बियाने मिळविणे म्हणजे तारे वरची कसरत झाली आहे. त्यामुळे पावसाच्या लहरी पणाचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसण्याची व उत्पन्न वाढीसाठी बसेल. अशी परिस्थिती दिंडोरी तालुक्यात निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेली रोपे पुर्ण नष्ट झाल्याने रोपे उपलब्ध होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गासमोर रोपे टंचाई हे नवीन संकट आ वासून उभे राहिले आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध केलेल्या कांदा बियाने आणून, तसेच घरच्या घरी आपल्या शेतामध्ये गादी वाफा तयार करून रोपे तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अती पावसाने बियाने व रोपे पुर्णपणे सडून केल्याने कांदा लागवडी वर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.-लागवडी बरोबर उत्पादन खर्च देखील वाढणार ?यंदा जर योगायोगाने बियाने व रोपे जर मिळाली तर त्यासाठी किंमत अव्वाच्या सव्वा मोजावी लागले . बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर खर्च होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग व्दिधा अवस्थेत सापडला आहे. (१२लखमापूर)-यंदा प्रथमच कांदा पिकांचे बियाने व रोपे मिळवण्यासाठी आम्हाला पायपीट करावी लागत आहे. यंदा ही टंचाई निर्माण झाल्याने आमच्या हातातून कांदा पिक जाते की काय. यांची भीती निर्माण झाली आहे.कारण या कांदा पिकावर आमच्या सर्व आशा असतात.त्या आशा यंदा मावळ्याची चित्र तयार झाले आहे.-सचिन गणपत शिंदे,आडगावकर

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी