शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मतदारांमध्ये नागरिकत्व कायद्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 02:02 IST

नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही मतदारपडताळणीचे अपेक्षित कामकाज होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देआधार कार्डही दाखवेना मालेगावमध्ये मतदार पडताळणी मोहिमेला अडचण

नाशिक : नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही मतदारपडताळणीचे अपेक्षित कामकाज होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे.लोकसभा आणि विधनासभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला असून, जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये बीएलओंच्या माध्यमातून मतदारांची आॅनलाइन पडताळणी केली जात आहे. यासाठी आवश्यक असणारे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, तसेच भ्रमणध्वनी क्रमांकाची मागणी केली जात आहे. परंतु नागरिकत्व कायद्यासाठी या माहितीचा उपयोग केला जात असल्याच्या समजुतीने मालेगाव मध्य मतदारसंघातील रहिवाशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांपेक्षा मालेगाव मध्यमधील मतदार पडताळणीचे कामकाज अवघे ५४ टक्के इतकेच झाले आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत पडताळणीचे कामकाज पूर्ण करावयाचे असल्याने सदर काम पूर्ण होण्यास अडचण निर्माण झालीआहे.देशभरात सध्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहेत. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत या कायद्याला तीव्र विरोध करण्यात येत आहे. अशातच मतदार पडताळणीचे कामकाजही हाती घेण्यात आल्यामुळे मालेगावसारख्या शहरात या मोहिमेविषयी शंका उपस्थित करून नागरिक पडताळणीच्या कामाला सहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे. मतदान कर्मचाºयांनीदेखील आपला अनुभव सांगताना मालेगाव मध्यमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जाते.मालेगाव मध्य मतदारसंघात पडताळणी मोहिमेसाठी जाणाºया मतदार अधिकाºयांना अल्पसंख्याक मतदारांकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. अवघे ५४ टक्के कामकाज झाल्याचा जाब निवडणूक शाखेने विचारल्यानंतर स्थानिक मतदारांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि असहकाराची भावना समोर आली. यातून मार्ग काढण्यासाठी आता विचारविनिमय केला जात आहे.यंत्रणा सापडली कात्रीतया मोहिमेत मतदारांचा सहभाग वाढण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेला आता प्रयत्न करावे लागणार आहे. मतदारांमधील संभ्रम दूर होणे अपेक्षित असून, तसे झाले नाही तर या गैरसमजातून अन्य मतदारसंघातूनदेखील असहकार येऊ शकतो. एकीकडे बीएलओंवर पडताळणीचे काम करण्याची सक्ती असताना दुसरीकडे अल्पसंख्याक मतदारांचा असहकार अशा कात्रीत यंत्रणा अडकली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयVotingमतदान