शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लेकीच्या मृत्यूप्रकरणी पित्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 22:36 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि. २६) सात महिन्यांच्या गरोदर युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्रे शीघ्र गतीने फिरविल्यानंतर पित्याच्या पापामुळेच सदर दुर्दैवी युवती गर्भवती राहिल्याचा संतापजनक आणि नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याचा उकल अद्याप झाला नसला तरी मयत युतीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पित्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देघरामागे मोकळ्या जागी जयश्रीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

नात्याला काळिमा फासणारी घटना : तळवाडे दिगरला गर्भवती युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने खळबळ

 

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि. २६) सात महिन्यांच्या गरोदर युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्रे शीघ्र गतीने फिरविल्यानंतर पित्याच्या पापामुळेच सदर दुर्दैवी युवती गर्भवती राहिल्याचा संतापजनक आणि नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याचा उकल अद्याप झाला नसला तरी मयत युतीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पित्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तळवाडे दिगर येथील जयश्री अनिल जाधव (१५) असे मयत युवतीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरामागे मोकळ्या जागी जयश्रीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. ती ऐंशी टक्के भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सदर संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी तत्काळ जयश्रीचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. जयश्रीचे मामा संभाजी बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.पाच वर्षांपूर्वीच मयत जयश्रीचे मातृछत्र हरपले होते. तेव्हापासूनच जयश्री व तिचा लहान भाऊ भूषण यांना आईचे प्रेम देण्याऐवजी त्यांचा पिता अनिल रामदास जाधव याने मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. दरम्यानच्या काळात या दोन्ही मुलांना डांबून ठेवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले जात होते, असे जयश्रीचे मामा बिरारी यांनी सांगितले.शवविच्छेदनानंतर समोर आला प्रकारजयश्रीच्या मृतदेहाचे आज सकाळी सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनात जयश्रीच्या पोटात सात महिन्याचा पुरु ष जातीचा गर्भ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून नराधम पित्याच्या अत्याचारामुळेच मुलगी गरोदर झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.लैंगिक शोषण कायद्यानुसार गुन्हा दाखलसदर घटना उघडकीस आल्यानंतर सटाणा पोलिसांनी संशयिताला तत्काळ अटक केली असून, मयत युवतीच्या मामांनी दिलेल्या तक्र ारीनुसार संशयित पित्याविरु द्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर तपासात मुलाचे जबाब आणि अन्य पुरावे मिळाल्यानंतर संबंधितावर हत्येचा वाढीव गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. जयश्रीच्या शरीराने पेट घेतल्यानंतर तिचा भाऊ भूषण अथवा शेजाऱ्यांना तिच्या किंचाळण्याचा आवाज का आला नाही त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत आज तरी प्रश्नचिन्हच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू