शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:10 IST

पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी घातक खेळ प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक

नााशिक - नााशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गिरणारे - हरसूल या ग्रामीण भागातील रस्त्यांवर रोज हजारोंच्या संख्येने खासगी वाहनातून बेकायदेशीरपणे प्रवशांची जीवघेणी वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक सुरु असल्याने या अवैध वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. गुजरात सिमेवरील वाडा, पडसंन , खरशेत, ओझरखेड, भागापासून ते हरसूल, गिरणारे पट्ट्यातील गोर गरीब आदीवासी मजूर, विद्यार्थी नाशिक व गिरणारे हर्सूल या ठिकाणी रोजगार, शिक्षण, बाजार व खाजगी कामासाठी दररोज ये-जा करतात. अशा वेळी थेट टॅक्सी, जीपला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. अशा प्रकारच्या वाहनांना एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंधामुळेच हे सुरू असून, बºयाच खाजगी गाडयांना वाहन विमा नसल्याने, तसेच बरीच वाहने नादुरुस्त असतानाही चालविली जातात. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कधी तपासले जात नाही. त्यामुळे कागदपत्रांची अपूर्तता असल्यास एखादा प्रवासी अपघातात दगावला तर वेळप्रसंगी त्याला विमा कंपनीकडून विमा नाकारला जातो. परंतु याची काळजी प्रवाशी वाहतूक करणाºयांना नसून, प्रवाशीही कमी पैशात प्रवास होतो म्हणून या खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहे. या भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, एस. टी. महामंडळानेच दर अर्धातासाला गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक