शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घातक जैविक कचरा रस्त्यावर फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:59 IST

सातपूर परिसरातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सातपूर, त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याच्याकडेला हा जैविक कचरा फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान व शाळा आहे. जैविक कच-यामुळे कावीळ, क्षयरोग

ठळक मुद्देसातपुर-त्र्यंबकरोड : महापालिकेकडून गंभीर दखल

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असतांना हा कचरा शाळेजवळ उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.सातपूर परिसरातील डॉक्टरांबरोबर शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सातपूर, त्र्यंबकेश्वर मुख्य रस्त्याच्याकडेला हा जैविक कचरा फेकण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यालगत लहान मुलांसाठी खेळण्याचे उद्यान व शाळा आहे. जैविक कच-यामुळे कावीळ, क्षयरोग सारखे गंभीर आजार होऊ शकतात. मात्र यासंदर्भात आवश्यक त्या प्रमाणात जनजागृती केली जात नाही. सातपूर परिसरात लहान-मोठे रुग्णालये आहेत. या दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा सर्रास उघड्यावर टाकला जात आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या या जैविक कचºयात सलाईन, सिरींज,नळ्या, इंजेक्शनसह विविध औषधी गोळ्यांचा समावेश होता. या कच-याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा शासनाचा आदेश असताना मात्र हा कचरा उघड्यावर फेकून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिसरातील विद्यार्थी कुतूहलाने या कच-यातून इंजेक्शन, सलाईन नळ्या उचलतात. जैविक कच-याचे व्यवस्थापन डॉक्टरांकडून केले जात नसल्याने व वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळेच सर्रास हा कचरा फेकून दिला जातो. दरम्यान मनपा आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी याठिकाणी भेट देवुन पाहणी केली आहे. कुठल्या रुग्णालयाने कचरा टाकला याचा तपास करुन कारवाई करणार असल्याचे विभागीय स्वच्छता निरिक्षक माधुरी तांबे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक