लोकमत न्युज नेटवर्कवणी : पायी शेतात जाणाऱ्या महीलेवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास दबा धरु न बसलेल्या बिबट्याने हल्ला करु न महीलेला गंभीर जखमी केले आहे.मिराबाई सावळीराम जोपळे (७०) चौसाळे येथष राहणारी ही वृद्ध महीला सोमवारी (दि.३) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पायी मुरलीधर भरसठ यांच्या शेतात कामासाठी जात असताना अचानक शेजारच्या झुडुपातुन बिबट्याने उडी घेत मिराबाई यांच्यावर हल्ला केला. अनपेक्षित झालेल्या हल्याने मिराबाई प्रचंड घाबरल्या, अचानक अंगावर आलेल्या या बिबट्याने शरीराच्या विविध भागांवर हल्ला झाल्याने मदतीसाठी मिराबाई यांनी आवाज दिला. त्यादरम्यान बिबट्याने तेथुन धुम ठोकली.या हल्यातून स्वत:ला सावरत मिराबाई जखमी स्थितीत शेत मालक भरसठ यांच्या घरी पोहचल्या. त्यांना तात्काळ चौसाळे येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. एरवी रात्री अपरात्री सायंकाळी विविध भागात दर्शन देणाºया बिबट्याने भरदुपारी वृद्ध महीलेवर हल्ला केल्याने वाड्या-वस्तीत राहणाºया शेतकरी कुटुंबियात घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.(फोटो ०३ वणी बिबट्या, ०३ वणी बिबट्या १)
वृद्ध महीलेवर भरदुपारी बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 17:36 IST
वणी : पायी शेतात जाणाऱ्या महीलेवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास दबा धरु न बसलेल्या बिबट्याने हल्ला करु न महीलेला गंभीर जखमी केले आहे.
वृद्ध महीलेवर भरदुपारी बिबट्याचा हल्ला
ठळक मुद्देवणी : अनपेक्षित झालेल्या हल्ला; गंभीर जखमी