शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस व ट्रकची धडक; दहा जणांचा मृत्यू तर ३४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2023 08:46 IST

उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते.

- शैलेश कर्पे

सिन्नर (जि नाशिक) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. त्यानंतर खासगी बस रस्त्यावर उलटली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश असून दोन पुरुष व  दोन लहान मुले आहेत. वावी पाथरे दरम्यान पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. दहा जणांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या आणण्यात आले आहेत. या अपघातात ३४ जण जखमी असून त्यांना सिन्नरच्या विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शिर्डी महामार्गावर पाथरे  शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला. अंबरनाथ, उल्हासनगर भागातून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खासगी आराम बस (क्र. एम एच ०४ एफ के २७५१) सुमारे ५० प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे निघाली होती. शिर्डी महामार्गावर वावी गावानंतर आराम बस व ट्रक(क्र. एम एच ४८  यांची समोरासमोर धडकली. त्यानंतर खासगी बस उलटली.

या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, तर जण जखमी झाले.  आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ७ ते ८ रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णाला देण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.

अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे येथून सुमारे १५ खासगी बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या अशी माहिती मिळते. अपघातग्रस्त बस पाच नंबर ची असल्याचे समजते. प्रवासी यादीनुसार बसमध्ये नव्हते काही प्रवासी बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते. जखमींना विविध ठिकाणी नेल्याने मृतांची व जखमींची नावे कळण्यास उशीर होईल. अपघातात बस एक बाजू पूर्णपणे कापली गेली.जखमींमध्ये महिला व बालकांचा समावेश आहे. मृतांमध्ये सहा महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता व काचेचा खच साचला होता.

अपघातातील मृत व्यक्तींची नावे १) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-४५, २) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,३) श्रावणी सुहास बारस्कर,वय ३०, ४) श्रद्धा सुहास बारस्कर, वय-४५) नरेश मनोहर उबाळे,वय-३८ या सर्व रा.अंबरनाथ६) बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५(ड्रायव्हर)७) दिक्षा संतोष गोंधळी, वय-१८ रा.कल्याण

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक