शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 5:19 PM

सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्दे पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही ह्या कॉ॑क्रिट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.

सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले.मागील पाच सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम ज्या संथगतीने सुरू झाले होते त्यापेक्षा अधिक गतीने हे काम बंद पडले होते. पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही ह्या कॉ॑क्रिट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.सुरवातीला जे काही काम करण्यात आले ते इस्टीमेट प्रमाणे करण्यात आले नव्हते. शहरात जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने सदर रस्ता इस्टीमेट प्रमाणे व लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती.मात्र संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. या कारणास्तव मंगळवारी (दि.२२) याच रस्त्यावर उपोषणाला बसण्याचा भाजपा युवा मार्र्चाचे तालुकाध्यक्ष सचिन महाले यांच्या नेतृत्वाखाली इशारा दिला होता.यादरम्यान दोन दिवस आधी संध्याकाळी संबंधितांकडून जेसीबी लावून खडी पसरवून दाबण्यात आली. मात्र रस्ता पुर्ण कधी होणार याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून रस्त्यावर बसून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, नगरसेवक रंजना लहरे, डॉ. विनोद महाले, एन.डी. गावित, बाळकृष्ण सुर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, पुजा महाले, सुरेखा कातकाडे, आरती महाले, अंजली महाले, विमल महाले, विठ्ठल गावित, मनोहर जाधव, छोटू दवंडे, बप्पी महाले, पराग चौधरी, लव मेतकर आदी सहभागी झाले होते. दुपारच्या सुमारास मुख्याधिकारी सचिन पटेल, ठेकेदार, अभियंता ताठे हे उपोषण स्थळी आले. यावेळी सचिन महाले यांनी नागरिकांच्या वतीने या कॉ॑क्रिट रस्ता संदर्भात कैफीयत मांडली. जोरदार पाऊस सुरू असूनही आंदोलन सुरू ठेवण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी पटेल यांनी हा कॉ॑क्रिट रस्ता लवकरच पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मात्र हा रस्ता पुर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सचिन महाले यांनी दिला आहे. या आंदोलनाला माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आंदोलन स्थळी तहसिलदार किशोर मराठे, पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाStrikeसंप