अतिक्र मण काढण्यासाठी येवल्यात उपोषणयेवला : पाटोदा-अनकाई रस्ताअंतर्गत पाटोदा शिवारात बेकायदेशीर अतिक्रमण करून रस्ता बंद केला असून, सुवर्ण जयंती राजस्व अभियानअंतर्गत हा रस्ता कायमस्वरूपी खुला करावा, या मागणीसाठी पाटोदा येथील ९ शेतकरी येवला तहसीलसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. हे शेतकरी कायस्वरूपी या परिसरात राहतात. त्यांना शेतावर जाण्यासाठी पाटोदा-अनकाई रस्ता आहे. याची नोंद नकाश्यावरही आहे. या मार्गावरून वाहिवाटीची नोंद देखील आहे. परंतु या रस्त्यालगत चिंधू बाबूराव शेटे, उत्तम शेटे, नाना शेटे, भाऊराव शेटे, वाळूबा शेटे, भागवत बोराडे, या शेतकऱ्यांनी हा रस्ता जाणीवपूर्वक नांगरून कायमस्वरूपी रस्ता बंद केला. त्यामुळे उपोषण करणाऱ्या या आठ शेतकऱ्यांचा रस्ता कायमस्वरूपी बंद झाला असून शेतमाल मार्केटपर्यंत नेता येत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होतअसून वारंवार तहसील कार्यालयाकडे या प्रकरणी पाठपुरावा केल्याचे उपोषण कर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली आहे. कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.त्यामुळे उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचे अंबादास शेटे, वामन शेटे, नवनाथ नाईकवाडे, शिवाजी बोराडे, भावराव बोराडे यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
अतिक्र मण काढण्यासाठी येवल्यात उपोषण
By admin | Updated: September 1, 2015 23:32 IST