शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सावटातही शेतीची कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:46 IST

सिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटातही शेती मशागतीची कामे सुरु केलेली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : अशीच स्थिती अजून राहिल्यास खरीप हंगामावर परिणामाची शक्यता

सचिन सांगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटातही शेती मशागतीची कामे सुरु केलेली आहे.ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदी करताना अडचणी येणार नाही, परंतु कोरोनाचा उद्रेक वाढत राहिला तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे.रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर कोरोनाचा राज्यात शिरकाव झाला आहे. आगामी काळातील शेतीच्या कामांसाठी शेतकºयांची धावपळ सुरू झालेली आहे. साधारत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी करीत असतात. यासाठी अजून जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी शेतकºयांच्या हाती आहे, मात्र या तीन आठवड्यात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी अनुत्तरित आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेती शिवारात शेतकºयांची लगबग वाढली आहे. दरम्यान या महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही तर शेती व्यवसायाची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे ही अवस्था असताना दुसरीकडे कृषी साहित्य विक्र ी करणारे चिंतेत आहेत. यावर्षी शेतकºयांना लाल कांद्याचे उत्पन्न कमी झाल्याने बळीराजा संकटात आहे. तर काही शेतकरी कांद्यास दर नसल्याने उन्हाळ कांद्याची साठवणूक करीत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसिन्नर तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर होत असते. यात सर्वाधिक म्हणजे २८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. तर १४ हजार हेक्टरवर बाजरी, आठ हेक्टरवर ऊस तर एक हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली जात असल्याचे कृषी विभागाने सांगितले. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांनी नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरण आदी कामे उरकली जात आहे.संकटाची मालिका सुरूचगेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस झाल्याने, खरिपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. यात बाजरी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही रब्बी हंगामातही पाहिजे तशी पिके आली नाही. गहू, सोयाबीन, मका, कांदा तसेच भाजीपाला पिकांना चांगला दर मिळाला नाही. तर आता कोरोनामुळे शेतकºयांना आपला पिकलेला मालही बाजारापर्यंत नेता येत नाही, अशी स्थिती आहे. दोन वर्षांपासून बळीराजासमोर संकटांची मालिका सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी