शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चिंतित : हवेतील आर्द्रतेमुळे फूलं, फळगळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:20 IST

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसभर कडक ऊन, रात्री थंडी व पहाटे प्रचंड प्रमाणात दव पडत असून, या बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यातील डाळिंब पिकाला बसला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत. या बदलत्या हवामानामुळे बागेमध्ये मोठ्या प्रमाणात फुले व फळे गळत आहेत. त्यामुळे औषध फवारणीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे दर्जा घसरल्याने दरात होणार घट : डाळिंबबागांवर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असून, बागा विविध रोगांना बळी पडत असल्याने उत्पादनाचा दर्जा खालवत आहे. फळांची वाढ न होणे असे विविध परिणाम बागेवर होताना दिसत आहेत. दर्जाहीन उत्पादन निघाल्यास शेतकऱ्यांना डाळिंब अत्

शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी, प्रचंड दव अशी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घत नाही. गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली असलीतरी ढगाळ हवामान, कडक ऊन व रात्री पडणारी थंडी व पहाटेचे दव आशा विचित्र हवामानामुळे फळबागाधोक्यात आल्या आहेत. सकाळी पडणाºया दवामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वेळ राहात आहे. या दवामुळे फळाच्या देठाजवळ पाणी साचत असल्याने पिकाचे भाग ओले राहातात, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहोचून फूल व फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंबबागांसाठी केलेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे. फळधारणेस अडथला : पाटोदा परिसरात सुमारे साडेसातशे ते आठशे हेक्टर डाळिंबबागा असून, या भागातील शेतकरी दर्जेदार डाळिंब उत्पादन करीत असून, त्यांची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करीत आहेत. हवामानातील बदलामुळे फुलांवर येणाºया मधमाश्यांचे प्रमाणही कमी झाल्यामुळे फळधारणेस अडचण येत आहे. यामुळे नर फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकरीवर्ग विविध उपाययोजना करीत आहेत.कोट :- हवामानात वारंवार बदल होत आहे. त्यामुळे बागेवर दिवसातून दोन वेळेस बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. खर्च करूनही पीक हातात येते की नाही याची शंका आहे.- सुकदेव मेंगाणे, शेतकरी, पाटोदाफोटो : १४डाळींब