लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी शासननिर्णय करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना बियाणांसह दूध आदी ग्राहकपयोगी वस्तू सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्याची परवानगी मिळणार आहे.अन्न सुरक्षा योजनेंतर्गत असणाºया बीपीएल लाभार्थी, अंत्योदय लाभार्थी लाभ घेतात, मात्र मोजक्याच वस्तू उपलब्ध होत असल्याने इतर वस्तू महागड्या दरातच घ्याव्या लागत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित होणाºया गव्हाच्या विविध जाती, मध्य प्रदेश सिहोर, गुजरात सिहोर, खंडवा, लोकवन तसेच तांदळासाठी ११ जातींचा समावेश आहे. खाद्यतेल, कडधान्य, डाळी, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ व भाजीपालाही स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात शेतकºयांना रास्त दरात प्रमाणित बियाणे लागवडीसाठी दिली गेल्यास शेतकºयांना याचा लाभ मिळणार आहे. पिकांसाठी लागणारी रासायनिक खते, जंतुनाशके स्वस्त धान्य दुकान पुरवठा करणार आहे. शेतकºयांना अन्य दुकानदार चढ्या दरात विक्री केल्याने शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाचणार असल्याने ग्रामीण भागात योजनेला प्रतिसाद मिळणार आहे. याचा विचार गृहीत धरून शासनाने यापूर्वीही बºयाच प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातून वस्तू विक्री करण्याचे निर्णय झाले आहे, मात्र हा निर्णय लाभदायी असल्याचे शासन परिपत्रकात नमूद केले आहे.हा व्यवहार महाराष्टÑ विकास महामंडळ मर्यादित पुणे यामध्ये राहणार आहे. खेडेगावात दुग्धजन्य पदार्थ आदी ब्रॅण्डच्या उत्पादन विक्रीसाठी परवानगी दिली जाणार असल्याने खेडेगावात शहरातील वस्तू उपलब्ध होणार आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनाही लाभ मिळणार आहे. स्वस्त धान्य दुकाने कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. स्वस्त धान्य दुकानातून वस्तूंची विक्रीशेतीच्या उत्पन्नातून मिळणाºया वस्तू स्वस्त धान्य दुकानातून विक्री होणार असल्याने कृषी उत्पन्नालाही चालना मिळणार आहे. दुधाचे उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होणार आहेत. स्वस्त धान्य दुकानांमध्ये उत्पन्न वाढण्यासाठी संबंधित उत्पादन कंपनीशी संपर्क करणे आवश्यक राहणार आहे. शालेय वस्तू तसेच महाफार्म ब्रॅण्ड उत्पादित होणारी उत्पादने सदर कंपनी वितरकामार्फत राज्यातील रास्तभाव दुकानांपर्यंत करण्यात येईल.
शेतकऱ्यांना बियाणांसह वस्तू मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:16 IST
खडकी : स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी शासननिर्णय करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना बियाणांसह दूध आदी ग्राहकपयोगी वस्तू सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्याची परवानगी मिळणार आहे.
शेतकऱ्यांना बियाणांसह वस्तू मिळणार
ठळक मुद्देशासन निर्णय : सार्वजनिक वितरण व्यवस्थेला परवानगी