मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या शेतकºयांनी विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत आहे. मात्र ज्या शेतकºयांनी विमा काढलेला आहे अशा शेतकºयांच्या हातात एक दमडीदेखील पडलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पीकविमा न काढलेल्या शेतकºयांना मदत मिळत असताना पीकविमाधारक शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागवड केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने वारंवार औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक वाचविले होते. सन २०१८ मध्ये खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाचा अनेक शेतकºयांनी विमा काढला होता. कोरडा दुष्काळ असतानादेखील त्याची नुकसानभरपाई शेतकºयांना मिळालेली नाही. २०१९ मध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्याचीदेखील भरपाई मिळालेली नाही. काही विमाधारक शेतकरी दीड वर्षापासून, तर काही दोन महिन्यांपासून भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.येवला तालुक्यात सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडला असता मका पीक पाण्याच्या कमतरतेमुळे वाया गेले होते. तेव्हासुद्धा मी विमा काढलेला होता. २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झाले त्याचाही विमा काढलेला आहे. मात्र दोन्हीपण वर्षी एक रु पयांचीदेखील नुकसानभरपाई पीकविमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.- विठ्ठल वावधाने, पीकविमाधारक शेतकरी.
शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:15 IST
अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
ठळक मुद्देउदासीनता । तीन महिन्यांनंतरही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नाही