नाशिक : केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून थेट वीस रु पये किलो दराने कांदा खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने पुकारलेल्या टिष्ट्वटर आंदोलनाला पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अनेक शेतकºयांनी आपल्या टिष्ट्वटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करून वीस रु पये किलोने कांदा खरेदी करण्याची मागणी केली. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी सुरू आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक बाजार समित्या बंद आहेत. संचारबंदीमुळे शेतकºयांच्या कोणत्याही शेती मालाला बाजारभाव मिळत नाही. सध्या बाजार समित्यामध्ये कांद्याला सरासरी पाच रु पये किलो असा भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यातून शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे . संचारबंदीमुळे शेतकºयांना रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नाही. यामुळे संघटनेने टिष्ट्वटर आंदोलन सुरू केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यानी दिली. शनिवार (दि.९) पासून हे आंदोलन सुरू झाले असून, जोपर्यंत केंद्र सरकार कांदा खरेदीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. आता बहुतांशी कांदा उत्पादक शेतकºयांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकºयांनी टिष्ट्वटर अकाउंटद्वारे मुख्यमंत्री व पंतप्रधानांसह केंद्रीयमंत्र्यांना टॅग करून थेट कांदा खरेदीच्या मागणीचे टिष्ट्वट करणार आहेत अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
सरकारने कांदा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांचे टिटर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:47 IST