लोहोणेर : येथील शेतकरी अशोक गोविंदा अहिरे (५९) यांनी सायंकाळी आपल्या राहत्या घरात कौटुंबिक परिस्थितीने वैफल्यग्रस्त झाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्त्या केली. देवळा पोलीस ठाण्यात आत्महत्त्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी मयत अशोक अहिरे यांच्या खिशात ‘आपण आत्महत्त्या करीत असून, यासंदर्भात कोणाचाही दोष नाही,’ असा उल्लेख असलेली स्वहस्ताक्षरीत लिहिलेली चिठ्ठी सापडली असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील टोपने यांनी सांगितले. घटनास्थळी तहसीलदार कैलास पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. मयत अहिरे यांच्या पश्चात एक अविवाहित मुलगा व चार विवाहित मुली असा परिवार आहे. अहिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मंगळवारी (दि. १२) सकाळी लोहोणेर येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
लोहोणेर येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Updated: January 12, 2016 00:37 IST