मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील रवींद्र अभिमन निकम (३४) या शेतकर्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या केली आहे. रवींद्र यांचा मृतदेह आज सकाळी साडेसात वाजेला दाभाडी शिवारातील लेंडीनाला येथील मोकळ्या जागेत मिळून आला. या प्रकरणी सूरज सुरेश देवरे (२९) रा. दाभाडी यांनी छावणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्रवर बँकेचे कर्ज होते. तसेच त्याची सव्वा एकर शेती दुष्काळामुळे विकली गेली होती. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. या निराशेतून त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केली.याप्रकरणी छावणी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक ए. ओ. पाटील तपास करीत आहेत.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्त्या
By admin | Updated: November 7, 2015 23:50 IST