शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्येचे  सत्र जिल्ह्यात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:09 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे.

नाशिक/दिंडोरी : कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या आत्महत्या सरकारची डोकेदुखी बनली असून, उपाययोजना करण्याच्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी  करण्यास प्रशासनालाही विसर पडला आहे. मालेगाव तालुक्यातील खलाणे येथील मोठाभाऊ आप्पा शेलार (३५) या शेतकºयाने गळफास घेऊन तर मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील कोराटे लगत पालखेड बंधारा येथे राहणाºया संदीप अशोक कदम (३०) या तरुण शेतकºयाने शेतात विष प्राशन करून सकाळी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात जानेवारीपासून आजपावेतो ७४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्णात जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस व शेतीचे उत्पादन वाढले तसेच राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे यंदा शेतकरी आत्महत्या होणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. परंतु जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी विविध साधनांनी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. जिल्ह्णात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या असून, आजवर १४ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्या खालोखाल सधन व संपन्न समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकºयांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुचविल्या असून, कृषी, महसूल, सहकार खात्याच्या संयुक्त प्रयत्नातून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकरी शोधून त्याचे समुपदेशन करणे, त्याच्या कर्ज परतफेडीसाठी बॅँकांशी बोलून दिलासा देणे, जिल्हाधिकारी कार्यालयात मदत केंद्र कार्यान्वित करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि, त्या सर्व कागदावरच असून, शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी