शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

टमाटाच्या क्रेट चोऱ्यांनी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 16:21 IST

दिंडोरी तालुका : शेतकरी घरांना लावणार सीसीटीव्ही

ठळक मुद्देबाजारमध्ये एका क्रेटची किंमत अंदाजे २३० ते २५० रुपये एवढी आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ओझे, म्हैळुस्के, लखमापूर, उमराळे खुर्द येथील शेतकऱ्यांचे टमाट्याचे रिकामे क्रेट घराजवळून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याचे प्रमाण वाढल्यामुळमुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. या चोऱ्यांसंदर्भात ओझे येथील सुनील ढाकणे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे.म्हैळुस्के येथील सुरेश कुलकर्णी, उमराळे खुर्द येथील गुलाब हिरे , पाडे येथील सुभाष नाठे, लखमापूर येथील सतीश सोनवणे यांचेही टमाट्याचे क्रेट चोरी झाले आहेत. त्याप्रमाणे लखमापूर येथील मंगेश शिदे यांच्या पिकअप गाडीची स्टेपणी चोरीस गेली आहे. अनेक शेतकरी मार्केटमधून माल विकून आल्यानंतर रिकामे क्रेट आपल्या गाडीत किंवा घराजवळ कुठे तरी शेडमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवत असतात. रात्रीच्या वेळेस घराबाहेर कुणीही नसल्याचा संधीचा फायदा घेऊन या चोरट्यांनी शेतकऱ्यांचे रिकामे क्रेट चोरण्याचा सपाटा लावला आहे. तालुक्यात आतापर्यंत अशा क्रेट चोरीच्या किरकोळ घटना घडत आल्या आहेत; परंतु एकाच वेळेस दीडशे ते दोनशे क्रेट घराजवळून चोरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बाजारमध्ये एका क्रेटची किंमत अंदाजे २३० ते २५० रुपये एवढी आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी