शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने स्वयंस्फूर्तीने बुजविली धोकादायक विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:00 IST

देवळा : वाखारी येथील एका शेतक-याने रस्त्याकडेला असलेली धोकादायक विहीर स्वखर्चाने बुजवून टाकत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मालेगाव-देवळा रस्त्यावरील ...

देवळा : वाखारी येथील एका शेतक-याने रस्त्याकडेला असलेली धोकादायक विहीर स्वखर्चाने बुजवून टाकत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाट्यावर आठवडाभरापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत बस व रिक्षा कोसळून झालेल्या अपघातात २६ जण मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला होता.देवळा तालुक्यात रस्त्याकडेला असलेल्या अनेक धोकादायक व पडिक विहीरी आहेत. मेशी येथे झालेल्या अपघातामुळे या विहीरी चर्चेत आल्या.तोपर्यंत रस्त्याकडेला असलेल्या अशा धोकादायक विहिरींचा प्रश्न कुणी फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. तालुक्यातील प्रत्येक गावात असलेल्या अशा धोकादायक विहिरींची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली असून या विहीरींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. गावातील अशा विहिरींपैकी काही विहिरी या वापरात आहेत, परंतु या विहिरींना संरक्षक कठडे, अथवा कुंपण घालून सुरक्षात्मक व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तसेच ६० ते ६० वर्षापूर्वीच्या पडीक अवस्थेत असलेल्या अनेक धोकादायक विहीरी सद्या वापरात नाहीत. या पडीक विहीरी बुजवून टाकण्याची गरज आहे. परंतु यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा? कारण हया जुन्या विहीरींवर परंपरेने वारसदारांची संख्या वाढत गेल्यामुळे सातबारा उतार्यावर अनेक वारसदारांचा मालकी हक्क तयार झाला. अनेक ठिकाणी त्यांचे आपआपसातील वादांमुळे एकमत होत नसल्यामुळे या सामायिक पडीक विहीरींचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. यासाठी गावातीत ग्रामस्थांनी पुढाकार घेतला तर हा प्रश्न मार्गी लागणे सहज शक्य असल्याचे वाखारी येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.देवळा वाखारी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेली सामायिक वापरातील विहीर मेशी येथील अपघाताच्या घटनेनंतर विहिर मालक तानाजी खंडू आहेर, भास्कर अंबू आहेर, अर्जून अंबू आहेर यांनी आपली वापरातील विहीर जेसीबीच्या सहाय्याने बुजवून टाकली. त्यांच्या या निर्णयाचे सरपंच राहुल पवार, उपसरपंच डॉ. संजय सिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.-----------------------रस्त्याच्या कडेला आमची वडिलोपार्जीत जुनी सामायिक विहीर होती.विहीरीवर बसविलेल्या वीजपंपाच्या सहाय्याने शेतातील पीकांना पाणी देत होतो. विहीर धोकादायक आहे हे दिसत होते, परंतु या शेतीच्या गटात एवढी एकच विहीर असल्यामुळे आमचाही नाईलाज झाला होता. परंतु मेशी येथे झालेल्या बस अपघातानंतर आम्ही सर्व भावांनी एकत्र येउन चर्चा केली व विहीर बुजवून टाकण्याचा निर्णय घेतला.- तानाजी आहेर ( विहीर मालक, वाखारी )------------------देवळा वाखारी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेली ही धोकादायक विहीर बुजून टाका, अथवा तिला संरक्षणात्मक कठडे बांधा अशी सूचना ग्रामपंचायतीमार्फत संबंधित शेतकऱ्यांना दोन वर्षापूर्वी दिली होती. विहीरीला पाणी होते व ती वापरात असल्यामुळे फारसे गांभीर्याने घेतले नाही. परंतु मेशी येथील बस अपघाताच्या घटनेनंतर सदर शेतकºयांनी स्वयंस्फूूर्तीने विहीर बुजून टाकली. ग्रामपंचायतीने गावातील काही धोकादायक असलेल्या विहीरी बाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.-डॉ. संजय सिरसाठ ( उपसरपंच, वाखारी ) 

टॅग्स :Nashikनाशिक