दिंडोरी : रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम होत असून शेतीबरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा असे प्रतिपादन कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी केले,तालुक्यातील मोहाडी येथे कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक तुषार उगले, प्राध्यापक परमेश्वरी पवार, विक्रम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिकन्या यांनी निंबोळी अर्क फवारणी चे प्रात्यक्षिक करून दाखविले, निंबोळी अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो, कडूलिंबाच्या झाडा मध्ये असलेले घटक कीटकनाशकाचे काम करते, निंबोळी अर्काची फवारणी ही रासायनिक कीटकनाशक का सारखी बाधक नसून पिकांसाठी फायदेशीर असते, असे वैष्णवी जाधव यांनी सांगितले, कार्यक्रमास राजेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले,मोहाडी येथे कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले,
शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:44 IST
दिंडोरी : रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम होत असून शेतीबरोबरच मानवी जीवालाही धोका निर्माण होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा असे प्रतिपादन कृषिकन्या वैष्णवी जाधव यांनी केले,
शेतकऱ्यांनी अति रासायनिक औषधांचा वापर टाळावा
ठळक मुद्दे रासायनिक औषधांचा शेतीव्यवसायावर मोठा परिणाम