नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून दोन महिन्यांपासून या परिसरातील अधरवड, पिंपळगाव मोर येथील दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आठ दिवसांपूर्वी देवाचीवाडी येथील एका सहा वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव परिसरातील ठाकुरवाडी येथील आवडू सोमा आवाली (४५) हे शेतातून घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदरची घटना शनिवारी (दि.१३) रोजी रात्री ९:३०च्या सुमारास घडली. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे वनविभागाकडून परिसरात पिंजरा लावण्यात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील भयभीत झालेल्या शेतकरी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव, पिंपळगाव मोर, अधरवड, देवाचीवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून महिनाभरापासून या ठिकाणी होत असलेल्या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून दिवसाची शेतीची कामे बिबट्याच्या दहशतीखाली करीत आहेत. या लागोपाठच्या घटनेने परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी दिवसादेखील शेतीची कामे करण्यास घाबरत आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा व वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.खेडभैरव परिसरातील बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून काही निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.- सुनील वाजे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस(१४ नादूरवैद्य १,२)खेडभैरव परिसरातील ठाकूरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला आवडू सोमा आवाली शेतकरी.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 19:18 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून दोन महिन्यांपासून या परिसरातील अधरवड, पिंपळगाव मोर येथील दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आठ दिवसांपूर्वी देवाचीवाडी येथील एका सहा वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव परिसरातील ठाकुरवाडी येथील आवडू सोमा आवाली (४५) हे शेतातून घरी परतत असताना बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
ठळक मुद्देठाकूरवाडी येथील घटना : जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू