शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:21 IST

दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात भात आवणीला सुरुवात

दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा भीजपाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हैराण झाले होते. मात्र, सध्या पावसाचे आगमन झाल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात भात आवणीच्या कामाला मोठा वेग आला आहे.भात आवणी करताना गाळ करण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असते; परंतु सध्या पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे तसेच भाताचे रोप जास्त दिवसाची झाल्यामुळे बळीराजाने जास्त पावसाची वाट न पाहता कमी पावसावर भात आवणीला प्रांरभ केला आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी भात पिकाकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून सध्या भातशेती करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शेतकरी ज्या जातीच्या तांदळाला बाजारात जास्त मागणी आहे, अशा जातीची भात बियाणे खरेदी करून रोप टाकत आहेत. यात इंद्रायणी, कोळपी, दप्तरी, भोगावती, महालक्ष्मी, लालकोर आशा विविध जातींची बियाणे वापरली जातात.गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी इंद्रायणी जातीच्या भाताला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून येत आहे. या भागातील शेतकरी भात शेतीसाठी कुंडी वाफा, दलदल वाफा, जमीन पायरी टप्प्यात वाफा पद्धतीने भात शेती लागवड करीत आहेत. यासाठी संततधार पावसाची खूप गरज असते.दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात अशा स्वरूपाचा पाऊस कायमच पडत असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे या परिसराला भाताची नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. (२१ दिंडोरी)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती