शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका, शेतकऱ्यांसमोर शेती व्यवस्थापनाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 19:01 IST

राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या अनियमित पावसामुळेही तपमानात चढ उतार होऊ वातावरणातील जलदगतीने बदलामुळे शेती पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची शेती व्यवस्थापनाठी कसरत बगलफुटीच्या काळात द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव पेरणीसोबतच, कांदा साठविण्यासाठीही शेतकऱ्यांची लगबग

नाशिक : राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या अनियमित पावसामुळेही तपमानात चढ उतार होऊ वातावरणातील जलदगतीने बदलामुळे शेती पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता असल्याने बळीराजाची शेती व्यवस्थापन करताना कसरत होत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या काळात खास काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पावसापासून कांदा वाचविण्याचे संकट उभे असतानाच वादळी पाऊस आणि गारपिटीपासून फळभाज्या व पालेभाज्या वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले असताना जूनच्या उत्तरार्धात ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांवर जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या काळात होणाऱ्या गारपिटीमुळे पाने फाटणे, हिरव्या काडीवर जखमा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे जिवाणू करपा किंवा मोट्रीओडिप्लोडिया यांसारख्या बुरशा काडीमध्ये वाढण्याची शक्यता असते. द्राक्ष उत्पादक शेतकयांसमोर अशाप्रकारे करपा नियंत्रणाचे आव्हान असताना कांदा उत्पादक व फळभाज्या, पालेभाज्या उत्पादन शेतकरीही संकटात आहे. मान्सूनचा पाऊस तोंडावर आलेला असताना भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या आगमनाबरोबरच शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू होणार आहे. मात्र पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी किमान ८० ते ९० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्षबागेतील फुटीवरील बगलफुटीची वाढ जास्त प्रमाणात होताना दिसून येईल. अशा परिस्थितीत कॅनॉपीची गर्दी वाढेल व जुनी होत असलेल्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. याकरिता बागेत बगलफुटी वेळीच काढाव्यात व त्याचबरोबर तळातील २-३ पाने काढून टाकावीत. यामुळे फुटींची गर्दी टाळता येईल व रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल.- रावसाहेब पाटील, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

कांदा साठविण्याच्या कामाला वेगउन्हाळ कांद्याला संपूर्ण हंगामात केवळ ३०० ते ६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवटच्या टप्प्यात हे दर काही प्रमाणात वधारले असले तरी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळेच १ जूनपासूनच्या संपकाळात शेतकºयांनी कांदा बाजारपेठेत आणणे थांबविले असून, कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठविण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतु पुरेशी आणि तंत्रशुद्ध यंत्रणा नसल्याने घरात, गोठ्यात जशी जागा उपलब्ध होईल तसा कांदा साठविण्याची नामुष्की शेतकºयांवर आली आहे.

पावसाच्या अंदाजानुसार पीकपद्धती ठरवाभारतीय हवामानशास्त्र दरवर्षी एप्रिल महिन्यात लांबपल्ल्याचा हवामान अंदाज वर्तवते. त्यानुसार ज्या भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे त्या भागात कमी पाण्यावर येणाºया पिकांची निवड करावी. त्यात भुईमूग, सोयाबीन, घेवडा, मूग, मटकी, उडीद, धने तसेच कमी कालावधीचं तुरीचं वाण, बाजरी, ज्वारी, सूर्यफूल, मिरची इत्यादी पिकांच्या निवडीस प्राधान्य देण्याचा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी